राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे उद्यापासून होणार सुरु
News24सह्याद्री -
मुंबई -
मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहे, शाळा सगळ बंद करण्यात आले असून, आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे. याच अनलॉकच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.
कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना संमती देण्यात आली असून, कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे. थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.
No comments
Post a Comment