विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी सरकारकडून येणारी नाव बाजूला ठेवली जाणार : हसन मुश्रीफ
News24सह्याद्री -
मुंबई -
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी सरकारकडून येणारी नावे बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी भय्यासाहेब माने, जिल्हा बँकेचे युवराज पाटील गेले होते. सांत्वन केल्याच्या काही मिनिटांतच चंद्रकांत पाटलांचे आगमन झाले असून,विनय कोरे आणि चंद्रकांत पाटलांची सांत्वनापर चर्चा झाल्यानंतर त्या दिवशी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली असून, त्या बातमीवर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझे आणि देवेंद्रजींचे बोलणे झालेले आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचे ठरलेले आहे, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
तसेच, काही तांत्रिक अडथळे आणून निवडीबद्दल चर्चा झाल्यास न्यायालयात जाण्याबाबत निर्णय घेऊ, हे सगळे असंवैधानिक आहे. राज्यपालांवर आतापर्यंत अनेक आरोप झाले आहे, असेही मुश्रीफांनी स्पष्ट केले आहे.
No comments
Post a Comment