Breaking News

1/breakingnews/recent

गोस्वामी भाजपचा कार्यकर्ता आहे का? : अनिल परब

No comments

    News24सह्याद्री - 



मुंबई - 

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपाला सवाल करत म्हटले आहे की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवल होते. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असे परब यांनी सांगितले असून,भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले असून, त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, तसेच भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूने आहेत का? असतील तर तसे त्यांनी जाहीर करावे, असे शिवसेना नेते अनिल परब म्हणाले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *