Breaking News

1/breakingnews/recent

उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच : एकनाथ खडसे

No comments

     News24सह्याद्री - 



मुंबई - 

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते भलतेच आक्रमक झाले असून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे हे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना  त्यांनी भाजपवर निशाणा साधताना आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. तसेच उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अस वक्तव्य केले आहे. तसेच जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे.

तसेच, रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *