Breaking News

1/breakingnews/recent

पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, चंद्रकांत पाटीलांनी केला सवाल

No comments

   News24सह्याद्री - 



मुंबई - 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण 2018 चे प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे. 2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.

अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावे आणि आंदोलने करावीत, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अर्णव अटक प्रकरणी सोशल मीडियावरूनही आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो असे या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याच दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *