चंद्रकांत पाटलांचे दोन स्वभाव, एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा : हसन मुश्रीफ
News24सह्याद्री -
मुंबई -
राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद उफाळून आला आहे. याच दरम्यान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांचे दोन स्वभाव आहेत ,एक साधभोळा तर दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, असे मुश्रीफ म्हटले आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला आहे. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या आहे. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिला आहे. तसेच, पोटनिवडणुका लावा. कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला आहे. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. भाजपचा एकही आमदार नसल्याने पोटनिवडणुका कशा होतील? असे सवाल करतानाच जी गोष्ट होणारच नाही, त्यावर चंद्रकांतदादा कशासाठी बोलत आहेत?, असा सवालही त्यांनी केला आहे.
No comments
Post a Comment