मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे : शिवेंद्रराजे भोसले
News24सह्याद्री -
मुंबई -
आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी काही भूमिका मांडली आहे. मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत असल्याची भावना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सावधानतेचा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.
मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असे नेहमी बोलले जाते. मराठा समाजातील असलेल्या दुफळी असल्यामुळे असे बोलले जाते. त्यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अदे सांगतानाच मी इथे राजे किंवा आमदार म्हणून आलो नाही. तर एक मराठा म्हणून या गोलमेज परिषदेला उपस्थित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ज्यांना आरक्षणाविषयी न्यान आहे त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून येथे आलो नसून मराठा म्हणून येथे आलो आहे. इतर समाजातील आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी नसून आमचे आहे तेच आम्हाला द्या. असे मत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
No comments
Post a Comment