Breaking News

1/breakingnews/recent

मुख्यमंत्री स्वत:च बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात : निलेश राणे

No comments

News24सह्याद्री - 


मुंबई - 

कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या सहा- सात महिन्यांपासून संपूर्ण देशातील उद्योग- व्यवहार ठप्प झालेले असताना जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच प्राधान्य दिले असून, मुख्यमंत्री यांनी देशविदेशातील १५ मोठ्या उद्योगसमूहांनी राज्यात सुमारे ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या आहे. नव्या करारांमुळे राज्यात २३ हजार रोजगार निर्माण होतील. सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे येत्या दोन महिन्यांत आणखी काही मोठ्या गुंतवणुकीचे करार होणार असून, राज्यात एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलले आहे. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

राणे ट्विट करत म्हटले आहे की, “स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल,” असे म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *