संजय राऊत हे जगातील 182 राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख : चंद्रकांत पाटील
News24सह्याद्री -
मुंबई -
बिहार मध्ये सत्ता आल्यास कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपचीच शाखा असून त्यांच्याकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही, असे ते म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की,संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख आहेत. जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख हे संजय राऊत आहेत. एवढ्या वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे, तर संपूर्ण जगातील विषयांवर मत आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय बोलणार, अशी उपहासात्मक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
No comments
Post a Comment