देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणे बंद करावे : प्रवीण दरेकर
News24सह्याद्री -
मुंबई -
एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टिका केली आहे. फडणवीसांकडून मानसिक छळामुळेच भाजपमधून बाहेर पडलो आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते . तसेच “भाजपामध्ये फडणवीसांनी मला छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला आहे. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितले होते. याच कारणास्तव आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एकनाथ खडसें यांना म्हटले आहे की, खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणे बंद करावे, तसेच ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असेही ते म्हणाले आहेत.
याच दरम्यान दरेकर म्हटले आहे की, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढ काम केले तेवढ कोणीही केले नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केले जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,” असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
No comments
Post a Comment