समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू : मायावती
News24सह्याद्री -
मुंबई -
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या ‘एमएलसी’ निवडणुकी अगोदर एक मोठे विधान केले आहे. गरच पडल्यास बसपा राज्यातील आगामी एमएलसी निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देईल. समाजवादी पार्टीच्या दलित विरोधी कार्यांविरोधातील आमची कठोर भूमिका दाखवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. असे मायावती यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत बसपाचे उमेदवार प्रकाश बजाज यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यांनी समाजवादी पार्टी रामजी गौतम यांच्याविरूद्ध उमेदवारी दाखल केली होती. बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपाच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीवर मायावती चांगल्याच संतापल्या होत्या. तेव्हा त्या म्हटल्या की, ”विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपाला मत देऊ वा इतर पक्षाला, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमच्या सात आमदारांना फोडले गेले आहे. ही गोष्ट समाजवादी पार्टीला महागात पडेल,” असा इशारा मायावती यांनी दिला होता.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment