Breaking News

1/breakingnews/recent

गोष्ट कायद्याची - कलम १२५ - जबाबदारी भरणपोषणाची

No comments

   News24सह्याद्री -



पत्नी, अपत्ये आणि आई-बाप यांचे निर्वाहाकरीता आदेश : -

पत्नी, अज्ञान मुलगा-मुलगी, अविवाहित मुलगी, अविवाहित, शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे स्वत:चे पालन-पोषण करू शकत नाही, असा सज्ञान मुलगा, वडील व आई या सर्व नात्यांतील व्यक्ती पोटगी मागू शकतात. पती, मुलगा किंवा वडील अशा नात्यातील ज्या पुरुषाकडे पोटगी मागायची आहे . ती व्यक्ती पोटगी देण्यासाठी सक्षम असली पाहिजे किंवा तिच्याकडे उदरनिर्वाहाची पुरेशी साधने असली पाहिजेत. अविवाहित मुलीची जबाबदारी तिच्या विवाहापर्यंत तिचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तिच्या वडिलांची आहे. अज्ञान विवाहित मुलीचा पती जर तिचे पालनपोषण करण्यास असमर्थ असेल तर त्या मुलीची जबाबदारी वडिलांनीच घ्यायची आहे. या कायद्याअंतर्गत महिना किमान काही रक्कम मिळवून देण्याची तरतूद आहे.

ज्येष्ठांना आपल्या मुलांकडून मिळणाऱ्या पोटगीबाबत भारतीय फौजदारी संहिता कलम १२५ (ड) नुसार योग्य त्या न्यायालयात पोटगीचे अर्ज दाखल केल्यानंतर आदेश पारित केले जातात. भारतीय फौजदारीसंहिता कलम १२८ नुसार सदर आदेशाची प्रत अर्जदारांना/ पक्षकारांना मोफत स्वरूपात देण्याचे आदेश पारित केले जातात. पोटगीच्या अर्जावरचा अंतिम आदेश आल्यानंतर दरमहा ठरावीक रक्कम पोटगी म्हणून देण्याचा आदेश गैरअर्जदारांना दिला जातो. मात्र या पोटगीची रक्कम अंतिम निकालाच्या तारखेपासून काही दिवसांनी बदलण्याचे अधिकारही भारतीय फौजदारी संहिता देते. अंतिम आदेश पारित झाल्यानंतर अर्जदार यांच्या परिस्थितीत काही बदल झाला तर ती बाब योग्यपणे विचारात घेऊन ते न्यायालय पोटगीच्या रकमेत वाढ करू शकते. त्याचप्रमाणे वाढणारी महागाई, अर्जदाराचा औषधोपचार व इतर दैनंदिन गोष्टींवर वाढलेला खर्च यांचाही विचार करून न्यायालय पोटगीच्या रकमेत वाढ करू शकते. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *