“फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला" काँग्रेसचा आरोप
News24सह्याद्री -
तत्कालीन फडणवीस सरकारने मागची पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. एक पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे कि मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची पाच वर्षे भाजपाने राजकारण केले आणि मुंबईकरांना फसवले. एवढच नाही तर मी माझे हे म्हणने कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेन असेही सचिन सावंत म्हणाले आहेत. मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला असून . त्यानंतर राज्य सरकारने प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचे पत्र केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले. मेट्रो कारशेडबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवण्यामागे ही राजकारण आहे.
त्या जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच आता केंद्र सरकार या जागेवर आपला दावा सांगत आहे असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.कांजूरमार्गची जागा घेण्यासाठी ५ हजार २०० कोटी रुपये भरा असं कोर्टाने सांगितल्याचं फडणवीस म्हणतात. पण तसे काहीही नसताना हे पेसै कुणाला देण्याची भाषा फडणवीस बोलत होते असाही प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.
No comments
Post a Comment