Breaking News

1/breakingnews/recent

विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी..

No comments

 News24सह्याद्री 






मुंबई -

आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोहलीने १५ सामन्यांत ४५० धावा केल्या परंतू महत्वाच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांतच होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या RCB ची गाडी नंतर रुळावरुन घसरली. तेराव्या हंगामात RCB चे आव्हान संपुष्टात आल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी RCB च्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला हटवण्याची मागणी केली असून. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्या वरही रनरेटच गणित सांभाळल्यामुळे विराटसेनेला प्ले-ऑफ चे  तिकीट मिळाले आहे. मात्र त्यानंतरही हैदराबादविरुद्धच्या सामन्यात RCB चा निराशाजनक खेळ सुरु होता. परंतू संघाचे प्रशिक्षक सायमन कॅटीच आणि डिरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स माईक हेसन यांनी विराटची पाठराखण केली.

“कर्णधारपदाचा विचार करायला गेल तर विराटसारखा खेळाडू कर्णधारपदावर असणे हे आमचे भाग्य आहे.सर्व खेळाडू त्याचा आदर करतात तो अत्यंत चांगला खेळाडू आहे. संघातील इतर तरुण खेळाडूंवर त्याने खूप वेळ खर्च केलाय, तो नेहमी त्यांच्यासोबत राहून त्यांना मार्गदर्शन करत असतो. विशेषकरुन देवदत पडीकलला त्याने चांगला पाठींबा दिला आहे. ही बाजू सहसा कोणीच बघत नाही. आम्ही शेवटपर्यंत लढत दिली, याचे श्रेय कर्णधार म्हणून विराटला मिळायलाच हवे.” एका वेबिनारमध्ये बोलत असताना कॅटीच यांनी आपले मत मांडले.सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळत करत RCB ने यंदा आपल्या चाहत्यांना विजेतेपदाची स्वप्न दाखवली होती. परंतू सलग ५ सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा RCB च्या चाहत्यांची निराशा झाली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *