सर्वच देशांनी प्रयत्न करायला हवेत - रोहित पवार
News24सह्याद्री -
मुंबई -
रोहित पवार यांनी केली चिंता व्यक्त अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकालाची सगळीकडे चर्चा सुरू असून. मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी बायडेन यांनी आघाडी घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जो बायडेन समर्थक एकमेकांना भिडले होते. काही शहरांमध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण झाला असून.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी थांबवण्यात आल्यानंतर वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडेन आणि ट्रम्प समर्थक समोरा समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. काही ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापटीही झाल्या, तर काही ठिकाणी तर असे दिसून आले पोलीस विरुद्ध विरोधक आंदोलक असे दिसून आले होते.
अमेरिकेत निर्माण झालेल्या ताणतणावावरून “जगातील सर्वांत जुनी लोकशाही असलेला व विकसित देश म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो. पण इथ शांततामय व लोकशाही मार्गाने सत्तांतर होण्याऐवजी लोक हाती बंदुका घेऊन रस्त्यावर उतरत असतील, तर ती लोकशाही ज्या वाटेने चाली आहे ते पाहून असं होऊ नये म्हणून सर्वच देशांनी प्रयत्न करायला हवे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरुन घोषणा देत होते. “Whose streets? Our streets!” आणि “If we don’t get no justice, they don’t get no peace!” अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. त्याचबरोबर आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची नासधूस केली असून. ज्या ठिकाणी हिंसा होऊ शकते अशा ठिकाणामधील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
No comments
Post a Comment