एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस..
News24सह्याद्री -
मुंबई -
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या सरकारने लगेचच दिवाळी बोनस आणि पगार जाहीर केला. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे मनोज चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. मनोज चौधरी यांच्या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारवर विरोधकांकडून चौफेर टीका सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment