Breaking News

1/breakingnews/recent

“पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो” महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

No comments

        News24सह्याद्री - 





मुंबई -


पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो  भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे.  अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य पेटून उठले आहे. तिथे आजही आंदोलन सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे 
असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.

सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेत. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेस या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे असेही बाळासाहेब थोरात या वेळी म्हणाले

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *