'आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू' : शाळा फी वाढीवरून राज ठाकरेंचा इशारा
News24सह्याद्री -
मुंबई -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेकडून मनमानी कारभार सुरु असून शाळेत वसूल केली जाणारी वाढीव फी यामुळे विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज कृष्णकुंजवर जाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देत ठाकरे म्हणाले की, आधी आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी पालकांना दिले आहे.
याशिवाय गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर पालकांनी मांडला आहे. यावर राज ठाकरे यांनी तातडीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे. याबाबत लवकरच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा सरकार काढत असून आपण पुन्हा एकदा वर्षा गायकवड यांच्याशी यासंदर्भात चर्चा करू, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment