Breaking News

1/breakingnews/recent

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल : वर्षा गायकवाड

No comments

   News24सह्याद्री - 



मुंबई - 

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. परंतू आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. 

त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, ऑनलाइन-ऑफलाइन प्रवेश झाले आहेत. तसेच ऑनलाइन अभ्यासाचा लाभ प्रवेश न झालेल्या विद्यार्थांनाही घेता येणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *