अर्णब गोस्वामी यांचा पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
News24सह्याद्री -
मुंबई -
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आज रायगड पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. यावेळी अर्णब यांनी कारवाई दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच पुढे अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर म्हटले आहे की, आज कारवाई करते दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांना व मुलालाही मारहाण केली आहे. तसेच, अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला असून, हाताला व पाठीत देखील मारले आहे, अशी माहिती गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. तसेच, अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी स्पष्टीकरण देताना अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.
No comments
Post a Comment