चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याची गरज नाही : हसन मुश्रीफ
News24सह्याद्री -
मुंबई -
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन अस वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याला राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे की, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी? हे होणार नाही, हे चंद्रकांत पाटील यांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप पक्षही परवानगी कशी देईल? दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे, असे हसन मुश्रीफ म्हटले आहे.
No comments
Post a Comment