Breaking News

1/breakingnews/recent

IPL 2020: हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय

No comments

  News24सह्याद्री - 


नवी दिल्ली - 

काल झालेल्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान हैदराबादने 5 विकेट्स गमावून 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले आहे. हैदराबादकडून ऋद्धीमान साहाने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर मनिष पांडे आणि जेसन होल्डर प्रत्येकी 26 धावा केल्या आहे. बंगळुरुकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि इसरु उडाणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची निराशाजनक सुरुवात झाली. हैदराबादला 10 धावांवर पहिला झटका बसला असून, कर्णधार डेव्हिड वॉर्नर 8 धावांवर बाद झाला. तर यानंतर ऋद्धीमान साहा आणि मनिष पांडे या दोघांनी दुसऱ्या विकेट्साठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. यानंतर मनिष पांडे 26 धावांवर बाद झाला. यानंतर ऋद्धीमानने हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋद्धीमानही 39 धावांवर बाद झाला. ऋद्धीमानने 32 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 39 धावा केल्या. केन विलियम्सनला विशेष काही करता आले नाही. केन 8 धावांवर बाद झाला. हैदराबादला विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या घाईत 8 रन्सवर आऊट झाला. यानंतर जेसन होल्डरने षटकार खेचत हैदराबादला विजय मिळवून दिला. होल्डरने 10 चेंडूत 1 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 26 धावा केल्या आहे.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 120 धावा केल्या आहे. हैदराबादच्या गोलंदाजांपुढे बंगळुरुच्या फंलदाजांनी गुडघे टेकले. हैदराबादने बंगळुरुला ठराविक अंतराने धक्के दिले आहे. बंगळुरुकडून सलामीवीर जोश फिलिपने सर्वाधिक 32 धावा केल्या आहे . तर तर एबी डी व्हीलियर्सने 24 धावा केल्या आहेव. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहे तर, थंगारसु नटराजन, शहाबाज नदीम आणि रशीद खान या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *