Breaking News

1/breakingnews/recent

IPL 2020 : मुंबईविरुद्ध हैदराबादचा एकही विकेट न गमावता दणदणीत विजय

No comments

    News24सह्याद्री -


नवी दिल्ली - 

मुंबईविरुद्ध हैदराबाद सामन्यात हैदराबादने मुंबई इंडियन्सवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह हैदराबादने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजय आव्हान एकही विकेट न गमावता 17.1 ओव्हरमध्येच पूर्ण केले आहे. हैदराबादने 151 धावा केल्या. हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी केली आहे. या दोघांनी नाबाद 151 धावांची सलामी भागीदारी केली आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 10 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 85 धावा केल्या आहे. तर ऋद्धीमान साहाने 45 चेंडूत 1 सिक्स आणि 7 फोरसह नाबाद 58 धावांची खेळी केली. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला एकही विकेट घेता आली नाही.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 149 धावा केल्या आहे. तर मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक धावा केल्या आहे. पोलार्डने 25 चेंडूत 2 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 41 धावा केल्या आहे. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. मुंबईकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने 25 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 36 रन्सची खेळी केली. तर इशान किशन 33 धावांवर बाद झाला. हिटमॅन रोहित शर्माने 4 सामन्यानंतर पुनरागमन केलं. मात्र त्याला विशेष काही करता आले नाही. रोहित 4 धावांवर माघारी परतला. कृणाल पांडयाला भोपळाही फोडता आला नाही. सौरभ तिवारी 1 धावेवर बाद झाला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *