IPL 2020 : दिल्लीचा बंगळुरूवर दणदणीत विजय
News24सह्याद्री -
नवी दिल्ली -
काल झालेल्या सामन्यात दिल्लीने बंगळुरुवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह दिल्ली प्ले ऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. बंगळुरुने दिल्लीला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 4 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये पूर्ण केले आहे. दिल्लीने 154 धावा केल्या. दिल्लीकडून अजिंक्य रहाणे 60 तर शिखर धवनने 54 धावांची खेळी केली आहे. बंगळुरुकडून शहबाज अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
अजिंक्य रहाणेने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले आहे. या आधी त्याने ५ सामन्यात केवळ ५१ धावा केल्या होत्या, पण कालच्या सामन्यात त्याने ४६ चेंडूत ६० धावा केल्या आहे. यंदाच्या हंगामातील हे अजिंक्यचे पहिले अर्धशतक ठरले असले तरी त्याने मोक्याच्या क्षणी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५ षटकारांसह ५० धावा केल्या आहे. तसेच डीव्हिलियर्सने २१ चेंडूत २ षटकारांसह ३५ धावा केल्या आहे. त्यामुळे संघाला १५२ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे यांनी अनुभव पणाला लावत ६५ चेंडूत ८८ धावांची भागीदारी केली आहे. शिखर धवनने ४१ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावा केल्या आहे. तर अजिंक्य रहाणेने ६० धावा केल्या आहे. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दणदणीत विजय मिळवला आहे.
No comments
Post a Comment