Breaking News

1/breakingnews/recent

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार बनेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

No comments

  News24सह्याद्री -


नवी दिल्ली - 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर बिहारमधील अररिया येथील फारबसगंजमध्ये एका सभेला संबोधित केले असून, यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आणि सुरूवातीची जी महिती मिळत आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार बनेल. बिहारच्या पवित्र भूमिने निश्चय केला आहे की यावेळी बिहारचा विकास करायचा आहे. बिहारच्या जनतेने जंगलराज आणि युवराजांना नाकारले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले आहे. 

तसेच मोदी पुढे म्हटले की,“बिहारच्या जनतेला माहित आहे की कोण विकासासाठी काम करत आहे. बिहारमध्ये परिवारवाद होत आहे. आणि लोकशाही, विकासाचा विजय होत आहे. आज बिहारमध्ये अहंकार हरतोय आणि मेहनत जिंकत आहे. बिहारमध्ये घोटाळ्याचा पराभव होत आणि लोकांचा हक्काचा विजय होत आहे, कायद्याचे राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे. मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीची खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होते. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,” असेही मोदी यावेळी म्हणाले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *