IPL 2020 : चेन्नईचा पंजाबवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
News24सह्याद्री -
नवी दिल्ली -
चेन्नईने पंजाबवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 9 विकेट्स राखून 18.5 ओव्हरमध्येच पूर्ण केले आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला आहे. ऋतुराजने 49 चेंडूत नाबाद 62 धावांची नाबाद खेळी केली आहे. ऋतुराजने याखेळीत 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर फॅफ डु प्लेसिसने 34 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्ससह 48 धावा केल्या आहे. तर अंबाती रायुडूने नाबाद 30 धावा केल्या आहे. पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने एकमेव विकेट घेतली आहे.
चेन्नईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले असून, पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. पंजाबकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक धावा केल्या आहे. हुड्डाने 30 चेंडूत 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 62 धावांची नाबाद खेळी केली आहे. तर कर्णधार केएल राहुलने 29 आणि मयंक अग्रवालने 26 धावा केल्या आहे. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
No comments
Post a Comment