भारताची चिंता वाढवू शकतो बायडेन यांचा विजय
News24सह्याद्री -
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खूप चुरसीची झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असून बायडेन हे विजयापासून अवघ्या काही मतांनी दूर आहेत. मात्र बायडेन यांचा विजय झाल्यास ते भारतासाठी थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. यामागील मूळ कारण म्हणजे बायडेन यांचे कलम ३७० ला समर्थन असून ते पुन्हा काश्मीरमध्ये लागू करावे अशी मागणी त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यानही झाली होती.
त्यामुळेच पाकिस्तानप्रेमी बायडेन हे राष्ट्राध्यक्ष होणे भारताच्या भूमिके विरोधात भाष्य केले आहे. अमेरिकेतील मुस्लीम लोकांना आकर्षित करण्यासाठी बायडेन यांच्या निवडणूक प्रचारातील वेगवेगळ्या गटांनी काश्मीरमधील मुस्लिमांची तुलाना चीनमधील उइगर आणि बांगलादेशमधील रोहिंग्या मुस्लिमांशी केली होती. आपल्या प्रचारादम्यान मुस्लीम मतांसाठी बायडेन यांच्या टीमने भारताने रद्द केलेल कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भातही भाष्य करण्यात आल होत.
No comments
Post a Comment