महाराष्ट्रात नावलौकीक मिळवणारे आ.निलेश लंके यांचे रूपाने भाऊ मिळाला : खा.सुप्रियाताई सुळे
News24सह्याद्री -
आ.निलेश लंकेनी वर्षपूर्ती निमित्ताने बेवसाईटच्या माध्यमातून जगासमोर मांडला विकासकामांचा लेखाजोखा । वेबसाईटचे खासदार सौ.सुप्रियाताई सुळेंच्या हस्ते मुंबईत शुभारंभ
नगर सह्याद्री । शरद झावरे -
नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या विकासकामांचा एक वर्षाचा लेखाजोखा वेबसाईट माध्यमातून आपल्याला आपल्या मतदारांसह संपुर्ण जगासमोल मांडला आहे. बुधवारी खासदार सौ.सुप्रियाताई सुळे या आमदार निलेश लंके यांच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्ताने संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे संसद रत्न,खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सदर mlanileshlanke.com या संकेतस्थळावर जाऊन मतदार संघातील व संघा बाहेरील कुठलाही मतदार व इतर कुठलीही व्यक्तीला एक वर्षातील सर्व राजकीय-सामाजिक, शैक्षणिक व इतर कामाचा लेखाजोखा पाहता येणार आहे. अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिली. यावेळी आ.निलेश लंके, तंत्रस्नेही शिक्षक संदीपजी गुंड व यांच्या सार्वभौम सामाजिक कार्याचा देशाचे नेते शरद पवार,पालक मंत्री ना.हसनजी मुश्रीफ, ना.छगन भुजबळ यांनी या आनोख्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. व महाराष्ट्रात तांत्रिक क्षेत्रात अनोखे योगदान देणाऱ्या या तंत्रस्नेहींना महाराष्ट्रात ओळख निर्माण करून देणार असे आश्वासित केले .
आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले अकोळनेर डिजिटल ग्राम या संकल्पनेतून तंत्रस्नेही संदीपजी गुंड यांनी देशातील हायटेक शाळा बनविण्याचा प्रयास वेबसाईट द्वारे सुप्रियाताईंना दाखविला व या आशयाच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा मानस आहे असे पारनेर नगरचे आमदार निलेशजी लंके यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांना सुचित केले.
पारनेर नगर विधानसभा मतदार संघात आमदार आपल्या दारी या नावाने सॉफ्टवेअर लवकरच जनतेच्या सेवेत देत असल्याचे व त्याची तयारी पूर्णत्वास आली आहे असे आमदार लंके यांनी सुप्रियाताई सुळे यांना सांगितले. शुभारंभ झालेल्या वेबसाईटची निर्मिती दीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुंड यांच्या टीमने केले आहे. आमदार निलेश लंके आमदार झाल्या नंतरच्या सर्व योजना,विकास कामे,सामाजिक व शैक्षणिक कार्य, कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन मध्ये केलेले सामाजिक शैक्षणीक कार्य, ऑनलाईन शाळा , पोलीस अॅकेडमी,कोविड केअर सेंटर मधून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा देऊन महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या आमदारांचा संपूर्ण लेखाजोख्याचे बुधवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभाग्रहात खा.सुप्रीया सुळे यांच्या हस्ते या वेब साईटचे लोकार्पण करण्यात आले.
सदर शुभारंभ प्रसंगी ना.दत्तामामा भरणे,लोकनेते आमदार निलेशजी लंके,आमदार डॉ. किरण लहामटे,दत्ता बाळसराफ यांचे समवेत महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेशजी सरडे,तंत्रस्नेही शिक्षक संदीपजी गुंड,गटविकास अधिकारी किशोरजी माने साहेब,वनकुटे गावचे सरपंच झावरे, बाळासाहेब खिलारी,संदीप चौधरी, प्रसार माध्यम प्रमुख श्रीकांत चौरे,नितीनशेठ चिकणे बाळासाहेब लंके,संदीप ठाणगे,संभाजी वाळूंज, कांतीलाल भोसले यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या वेबसाईटचा लोकार्पण संपन्न झाला.
आ निलेश लंके ठरले महाराष्ट्रातील एकमेव आमदार..
पारनेर नगर विधानसभा मतदार संघात आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली पोलिस भरतीसाठी " खाकी" टाकळी ढोकेश्वर- कर्जुले हद्दीवर १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर त्यानंतर आपल्या मतदार संघात विकासाचा लेखा जोखा मांडण्यासाठी स्वतःच्या नावाने बेवसाईट चालु करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कामाचे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी कौतुकाची थाप टाकली आहे त्यामुळे आमदार निलेश लंके हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरले आहेत.
लोकनेते निलेश लंके यांच्याकडे कोणत्याही कामाच्या आशेने गेलेला व्यक्ती मग तो कोणत्या जातीचा,धर्माचा कोणत्याही पक्षाचा असो आपले काम होणारच, खरतर त्यांच्या कडे जाण्या अगोदरच आपले काम नक्की होणार या आशेने माणूस आनंदी असतो.
ReplyDeleteलोकनेते निलेश लंके पारनेर-नगर मतदार संघाला मिळालेली देणगी आहे.