Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - साईबाबांची शिर्डी मानवी तस्करी अन् अवयव चोरीचे केंद्र झालीय का ?

No comments

    News24सह्याद्री - 


जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डी उच्च न्यायालयाच्या नाराजीतून मानवी तस्करी आणि अवयव चोरीचे केंद्र झाली आहे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार असून औरंगाबाद उच्च न्यायालयाने शिर्डी पोलिस आणि अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांनी याअनुषंगाने केेलेल्या तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या चार वर्षात शिर्डीतून अनेकजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आणि त्याबाबत कोणताही तपास न लागल्याने शिर्डीत  मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास दस्तुरखुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा असा आदेशही न्यायालयाने दिलाय!

इंदूर येथील दीप्ती सोनी १० ऑगस्ट २०१७ ला शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर २२० पाणी अहवाल निरर्थक ठरवला. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नव्हता. मात्र पोलिसांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की, मानवी तस्करी याबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अतिशय निष्काळजीपणे या गंभीर प्रकरणाचा तपास केल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.


पोलिसांनी हायकोर्टात दिलेली शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. शिर्डीतून बेपत्ता झालेल्यांची मोठी आहे. सन २०१७ मध्ये ७१ बेपत्ता झाले आणि त्यातील २० जण अद्यापही बेपत्ता आहेत. सन २०१८  मध्ये ८२ बेपत्ता झाले त्यातील १३ तपास बाकी आहेत. सन २०१९ मध्ये ८८ जण बेपत्ता झाले आणि त्यातील १४ तपास बाकी आहेत. चालू वर्षात म्हणजेच सन २०२० मध्ये ३८ जण बेपत्ता असून यातील २० जणांचा अद्यापही तपास लागलेला नाही. शिर्डीत दररोज लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात त्यात बेपत्ता होण्याचं प्रमाण सुद्धा असून बेपत्ता महिलांमध्ये विवाहित महिला व मुलींचे मोठे प्रमाण असून हे बहुतेक सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत. दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र अनेकांचा शोध सुद्धा लागला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *