सह्याद्री क्राईम अलर्ट - खाकीला काळीमा; एपीआयने केली महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी
News24सह्याद्री -
खाकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी बातमी आहे. जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्या पोलिस दलात नक्की काय घडत आहे असा प्रश्न सध्या निर्माण झालेला दिसतोय!
न्याय मागण्यास आलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणी नगरमधील विकास वाघ हा पोलिस अधिकारी सध्या निलंबीत आहे. त्याच्यावर अत्याचार आणि गर्भपातासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हे प्रकरण ताजे असतानाच श्रीगोंद्यातील सहायक पोलिस निरीक्षकाने खाकी वर्दीची पुरती आब्रू घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस दलातील लोहमार्ग विभागात मुंबईत नियुक्तीस असणार्या महिला पोलिस कर्मचार्याचा विनयभंग करण्यापर्यंत या वासनांध सतीश गावीत याची मजल गेली.
सतीश गावीत या वासनांध पोलिस अधिकार्याची नजर फिरली आहे आणि तो विकृत असल्याचे निदर्शनास येताच या महिला पोलिस कर्मचार्याने थेट सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलिस ठाणे गाठले. घडलेली आपबीती तिने तेथे सांगितली. महिला पोलिस असणार्या महिलेच्या बाबत सतीश गावीत याने केलेले कृत्य आणि टाकलेले विकृत मेसेज पाहून सोलापूर पोलिस देखील परेशान झाले. याप्रकरणी गावीत याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० मधील ३५४ ड आणि ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा हा प्रकार आहे. नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात असाच प्रकार घडला. विकास वाघ नामक पोलिस निरीक्षकाने एका महिलेला असाच त्रास दिला आणि पुढे तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. तिचा गर्भपात करण्यापर्यंत त्याची मजल गेली. याबाबत गुन्हा दाखल होताच त्याला निलंबीत करण्यात आले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत आणि तो पोलिसांना सापडत नाही. हे प्रकरण ताजे असतानाच श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक पदावर काम करणार्या सतीश गावीत या अधिकार्याने या पोलिस महिलेसोबत केलेले वर्तन चिड आणि संतापजनक आहे. अत्यंत घाणेरड्या भाषेतील शरीरसुखाची मागणी करणारे हे मेसेज पोलिस दलाची अब्रू वेशीवर टांगणारे ठरले आहे.दरम्यान, याबाबत आम्ही सतीश गावीत यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया समजू शकली नाही.
गुन्हा दाखल होताच हा वासनांध सतीश जाधव आजारी रजा टाकून पसार झाला आहे. त्याच्याशी संपर्क होत नाही. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे काय कारवाई करतात हे आता पाहावे लागणार आहे.
No comments
Post a Comment