आरोग्याचा पासवर्ड - सणासुदीत अन् कोरोणासंसर्गात कशी घ्याल डोळ्याची काळजी?- डॉ. सुंदर गोरे व डॉ. सीमा गोरे
News24सह्याद्री -
नगर शहरातील चौपाटी कारंजा येथे सन २००० साली डॉ. सुंदर गोरे आणि डॉ. सीमा गोरे यांनी सुंदर नेत्रालय या नावाने अद्ययावत डोळ्यांच्या हॉस्पिटलची स्थापना केली. त्याला आज २५ वर्षे पूर्ण झालीत. सर्व सुविधा एकाच छताखाली व अद्ययावत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान योजनेसाठी २०१३ पासून जिल्ह्यातील सुंदर नेत्रालय या एकमेव सिंगल स्पेशालिटी आय क्लीनिकची निवड केली आहे. त्यामध्ये हजारो लोकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियाचा फायदा झाला आहे. सर्व कॅशलेस सुविधा नेत्र रुग्णांना सुंदर नेत्रालयामध्ये मिळू लागल्या. सुंदर नेत्रालय २०१२ पासून ‘आयएसआयओ ९००१’ प्रमाणित आहे. २०१९ साली अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त नेत्रचिकित्सा केंद्र आहे.‘डोळ्यांचे सौंदर्य आणि सर्वांगीण स्वास्थ्यासाठी कटिबद्ध’ हे ब्रीद उराशी बाळगून या सुंदर नेत्रालयाचा नेत्र प्रवास सुरु आहे. या अविरत प्रवासाला या वर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.लवकरच नगर शहरातील बुरूडगाव रोड व झोपडी कॅन्टीन येथे नव्याने सुंदर नेत्रालयाच्या शाखा सुरू होत आहेत.
राहाता तालुक्यातील राजुरी या छोट्याशा गावात जन्मलेले डॉ. सुंदर गोरे हे सन १९९२ साली नेत्रतज्ज्ञ झाल्यानंतर काही दिवस कराडला डॉक्टर ढगे यांच्या दवाखान्यात, त्यानंतर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे नेत्रतज्ज्ञ, १९९४ साली अहमदनगर येथे सिव्हील हॉस्पिटल येथे मोबाईल आँप्थॅल्मीक युनिटमध्ये नेत्रतज्ज्ञ म्हणून काम केले. या काळात जिल्हाभर नेत्र शिबिराच्या माध्यमातून एकेका दिवशी ६०-७० ऑपरेशन त्यांनी केले. कुष्ठधाम येथील रुग्णांची खूप आँपरेशन त्यांनी केली. ५ नोव्हेंबर १९९५ साली आनंदी बाजार पटवर्धन चौक येथे पहिल्या मजल्यावर छोटासा दवाखाना सुरू केला. मिसेस डॉक्टर सीमा नेत्रतज्ज्ञ असल्यामुळे सिव्हिल येथील नोकरी व प्रायव्हेट प्रॅक्टिस दोन्ही गोष्टी सुरु झाल्या.जेव्हा डोळ्यांचा दवाखाना सुरू केला त्यावेळेस नगरमध्ये फक्त आठ डोळ्यांचे डॉक्टर होते. आम्ही नववे होतो. आमची नेत्रतज्ज्ञांची टीम झाली. डोळ्याच्या विश्वात ग्रुप प्रॅक्टीसचे जिल्हात पहले मॉंडेल सुरू झाले. एकाच छताखाली सर्व सुविधा नेत्र रुग्णांना प्राप्त झाल्या. सर्व सुविधा एकाच छताखाली व अद्ययावत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान योजनेसाठी २०१३ पासून जिल्ह्यातील एकमेव सिंगल स्पेशालिटी आय क्लीनिकची निवड केली आहे.
त्यामध्ये हजारो लोकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियाचा फायदा झाला आहे. सर्व कॅशलेस सुविधा नेत्र रुग्णांना सुंदर नेत्रालयामध्ये मिळू लागल्या. सुंदर नेत्रालय २०१२ पासून ‘आयएसआयओ ९००१’ प्रमाणित आहे. २०१९ साली अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त नेत्रचिकित्सा केंद्र आहे.विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, हॅपी थॉट्स, प्रजापिता ब्रह्माकुमारी, पतंजली योगशास्त्र, लँडमार्क एज्युकेशन आदी गोष्टींचे मार्ग वेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच आहे. या सर्व गोष्टींच्या अनुभवावरून मी एक फार्मूला तयार केला. ’एचबीएच’ म्हणजेच हेल्थ, ब्युटी वा सौंदर्य आणि हॅपिनेस. मला हा हमरस्ता सापडला आहे, ज्या गोष्टी सुंदर आहेत त्याचा मी दास आहे, असं मला वाटतं.जिल्हाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुंदर नेत्रालय हे नगर जिल्ह्यातील परीपूर्ण नेत्रसेवा अग्रणी संस्था तर असेलच. शिवाय योगाचा प्रचार व प्रसार, कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत राहणार आहे. शहरातील नागरिकांसाठी विषमुक्त आहार देण्यासाठी ‘सुंदर बाग फार्म फ्रेश’ या फार्मर्स प्रोड्युसर लिमिटेड शेतकरी ग्रुपतर्फे शहरात ठिकठिकाणी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यात पुढाकार घेणार आहे.
‘डोळ्यांचे सौंदर्य आणि सर्वांगीण स्वास्थ्यासाठी कटिबद्ध’ हे ब्रीद उराशी बाळगून नेत्र प्रवास सुंदर नेत्रालयाचा आणि या अविरत प्रवासाला या वर्षी २५ वर्षे पूर्ण होतील. सुंदर नेत्रालया जिल्ह्यातील नेत्रसेवा देणारी अग्रगण्य संस्था असल्याचा सार्थ अभिमान तर आहेच पण या प्रवासात तुम्ही होता म्हणून हे शक्य झाले. आयएसओ २००९ व आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त नेत्र सेवा देणारी संस्था म्हणून असलेली ओळख सुंदर नेत्रालयाला विशेष उल्लेखनीय वाटते. होलिस्टिक नेत्रचिकित्सा, कॉस्मेटिक आय सर्जरी, प्रतिबंधक नेत्रचिकित्सा, ग्रुप प्रॅक्टिससाठी सुंदर नेत्रालयाची ओळख वेगळी असल्याचे डॉ. सुंदर गोरे आणि डॉ. सीमा गोरे यांनी सांगितले.मोफत शस्त्रक्रिया अन् झोपडी कँँटीन- बुरुडगाव रोडवर नव्या शाखा!लहान मुलातील मोतीबिंदू, काचबिंदू, आरओपीसाठी लेझर, तिरळेपणा शस्रक्रिया, बुबुळावर वाढलेले मास काढणे, रेटिनाच्या सर्व शस्त्रक्रिया व व्हिट्रेक्टॉमी, पापणी व्यंग संदर्भातील शस्त्रक्रिया, अंध असलेला व दुखत असलेला डोळा काढून खोबणीमध्ये ईम्प्लांट टाळण्याची शस्त्रक्रिया, परराज्यातील नागरिकांसाठी पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत बुबूळावर वाढलेले मांस काढण्याची व मोतीबिंदू शस्रक्रिया नंतर आलेली जाळे काढण्यासाठीची लेझर व इतरही बर्याचशा निवडक शस्त्रक्रिया सुंदर नेत्रालयात मोफत होतात. सुंदर नेत्रालय दोन शाखा सुरू करत आहे. लवकरच नगर शहरातील बुरूडगाव रोड व झोपडी कॅन्टीन शाखा सुरू होत असल्याचे डॉ. सुंदर गोरे यांनी सांगितले.
No comments
Post a Comment