उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेंचा - पहा श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानीची अख्यायिका
News24सह्याद्री -
महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते.
श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे. सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment