Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - पोलीस अधीक्षकांनी सुरु केली पोलीस खात्याची साफसफाई

No comments

        News24सह्याद्री  -  पोलीस अधीक्षकांनी सुरु केली पोलीस खात्याची साफसफाई.....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये



पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन .. कारण त्यांनी थेट आपल्या मुख्यालयापासून पोलीस दलाच्या स्वच्छता अभियानास प्रारंभ केला आहे.. होय... नक्कीच कारण सध्या जिल्ह्यात ज्या ऑडिओ क्लिप ने धुमाकूळ घातला आहे त्यामधील संभाषण  आणि या  नंतर अप्पर पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे .. त्या मुले भ्रष्टाराच्या स्वछता अभियानाची सुरुवात पोलीस अधीक्षकांनी आपल्याच कार्यालयातून केली आहे.  मात्र आता या क्लिप मधील गर्जे नावाच्या पोलिसाने 50 लाख रुपयांचा उल्लेख केला आहे .. याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे असे अनके गर्जे  प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये आहेत अशा  पोलीस ठाण्या  मधील गरजेंना वेळीच ओळखून पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करणेही तेवढेच गरजेचे आहे . जिल्हा पोलीस दलातील साफसफाई चालू झाली..  डिझेल तस्करीची गाडी पकडल्यानंतर मात्र सर्वात प्रथम ही बातमी न्यूज-24 सह्याद्रीने लावून धरली आणि त्यानंतर याबाबतचा मागोवा घेतला आणि त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आले की या ठिकाणी साफसफाई होणे गरजेचे आहे आणि ती साफसफाई न्यूज-24 सह्याद्री मुळे चालूही झालेली  आहे,..  पोलीस अधीक्षकांनी तातडीने पावले उचलून जिल्ह्यातील पोलिसांची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून जी कारवाई केली याबाबत नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे मात्र यानंतर पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान आहे .. 

ते या  बेकायदा गुटका आणि डिझेल विक्रीमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्याचे .. गुटख्याची श्रीरामपूर मधील कारवाई झाली मात्र या प्रकरणातील मुख्य  मोहरक्या  अजूनही पडद्या आडच आहे .. उत्तर नगर मधील  चोपडा या गुटका माफिया ने पोलीस दलाला जसं आपल्या हातचे बाहुले बनवलं काय ? असंच अनेक घटनांवरून दिसून येत आहे ... गुटख्याच्या अनेक कारवाई झाल्यात .. यामधील मुख्य सूत्रधार अद्यापही कधीच गजाआड झालेला नाही ... एव्हाना त्याचं नावही कधी साध्या कागदावर आलेली नाही त्यामुळे हा चोपडा आपलं साम्राज्य वाढवत असून आणि पैशांच्या जोरावर तो काहीही करू शकतो असं काहीस चित्र त्याने निर्माण केले आहे ., त्याच्या विरुद्ध बोलण्यास नागरिक काय पोलिसही बोलताना  दिसत नाहीयेत .. आता या गुटक्याच आणि बेकायदेशीर डिझेल विक्रीच्या माफियांचं साम्राज्य नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिस अधीक्षकांसमोर आहे .. आणि ते करतीलच असंच आजच्या कारवाईवरुन दिसून येतेय...  जिल्हयात अनेक अधिकारी आणि कर्मचारी चांगले आणि इमानदारीने काम करत आहेत .. त्यांना पाठबळ देणं हे काम पोलीस अधीक्षकांना करावे लागणार आहे. वाळू तस्करी, गुटका तस्करी,  डिझेल तस्करी ,गो मांस तस्करी या मुद्ययावरून काही आरोप पोलिसांवर झाले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *