सारिपाट सह्याद्रीचा - राज्यपालांचं हिंदुत्व अन् दानवेंचं येड्यागबाळ्याचं राज्य!
News24सह्याद्री - राज्यपालांचं हिंदुत्व अन् दानवेंचं येड्यागबाळ्याचं राज्य!...पहा सारिपाट सह्याद्रीचा
राज्यपालांच हिंदुत्वप्रेम शिवसेेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना चिमटा काढताना अजिबात लपून राहिले नाही. अर्थात त्यास उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना सणसणीत टोला लगावला हा भाग वेगळा! आता केंद्रात मंत्री असणार्या रावसाहेब दानवें साहेबांनी वापरलेली येड्यागबाळ्याची भाषा अकलेचे तारेच तोडणारी ठरली आहे. राजभवनाच्या प्रतिभेचे आणि प्रतिमेचे काय असा सवाल जसा मध्यंतरी हिंदुत्वाच्या लेटरबॉंबमुळे चर्चेत आला तसंच काहीसं दानवेंच्या गावरान वक्तव्याने झालं आहे! याची मोठी किंमत उद्या भाजपला मोजावी लागली नाही म्हणजे बरे!
राज्यात कोरोनापाठोपाठ अवाकाळी वादळी पाऊस यासह अनेक अस्मानी संकटं उभी असताना राज्याच्या राज्यपालांना हिंदुत्वाचा मुद्दा आठवतोच कसा हा थेट प्रश्न उपस्थित केला गेला. राज्यपाल महोदयांबद्दल सोशल मिडियातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या! एखाद्या राज्यपालाला राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून संबोधले जाण्याचा नवा विक्रमही यानिमित्ताने नोंदविला गेला. देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी राज्यपालांच्या अशा बेजबाबदार विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी हे महोदय या पदावर अद्यापही कायम कसे असा थेट सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला आहे आणि तो वास्तव वाटतो!
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल न बोललेच बरे! ती अत्यंत चिंताजनक आहे. आपल्या देशाचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला आहे. कुपोषणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर आहे.
एका बाजूला आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नगारे वाजवित असताना दुसर्या बाजूला कुपोषणाच्या बाबतीत पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली कशी या प्रश्नाचे उत्तर कोणी देणार आहे की नाही? कुपोषणाच्या मुद्याचा विचार केला तर जगातील १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान ८८, बांगलादेश ७१, म्यानमार ७८व्या क्रमांकावर आहे. नेपाळ, चीन, श्रीलंकेचे स्थान आपल्यापेक्षाही चांगले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला येण्यास कोरोना वगैरे कारणं असतीलही, पण ती बांगलादेशसारख्या देशांना का नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आज तरी कोणीच द्यायला समोर येताना दिसत नाही. अर्थात या प्रश्नाचं उत्तर केंद्रात मंत्री असणार्या रावसाहेब दानवे यांच्याकडे दिसत आहे.
No comments
Post a Comment