सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडणार...
News24सह्याद्री -
राज्यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोना संसर्गामुळे तो स्थगित करण्यात आला होता. याबाबतचे आदेश दि. १७ मार्च २०२० रोजी देण्यात आले होते. प्रभाग रचना अंतिम करण्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आलेला हा कार्यक्रम आता आज राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशाने सुरू होणार आहे.
प्रभाग रचनेच्या अंतिम टप्प्यानुसार उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकार्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून प्रभाग रचना आणि आरणक्षणाला अंतिम मान्यता देणे आणि त्यावर जिल्हाधिकारी यांना सही करण्यासाठी दि. २७ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांकडून मान्य करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेला नमुना अ मध्ये दि. २ नोव्हेंबर रोजी व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. राज्य निवडणूक विभागाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी याबाबतचे आदेश आजच काढले आहेत.
No comments
Post a Comment