Breaking News

1/breakingnews/recent

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का : विजय वडेट्टीवार

No comments

    News24सह्याद्री -



मुंबई - 

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचे का?, असा थेट सवाल केला आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. त्यांना वेठीस धरायला नको, असेही वडेट्टीवारांनी सांगितले आहे. तसेच, मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.

देशात जातीच्या लोकसंख्येनुसार त्या त्या वर्गासाठी आरक्षण द्यावे, ही आमची जुनीच मागणी आहे. देशात ज्या समाजाचे जेवढ प्रतिनिधित्व, त्या समाजाला तेवढे टक्के आरक्षण द्यावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता ही मागणी केली आहे, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

तसेच याच दरम्यान, दुसरीकडे मराठा आरक्षणावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा भाजपला धारेवर धरले आहे. फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे SEBC आहेत, असे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत. तसेच मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकला. तसेही आम्ही SEBC होतो आणि आताही आहे, पण मधल्या काळात भाजपाने लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात हरिभाऊ राठोड यांनी भाजपवर केला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *