Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते : विश्वजित कदम

No comments

    News24सह्याद्री -



मुंबई - 


कोरोना आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या बाबतीत आढावा बैठक राज्याचे कृषी व न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना घेतली असून, राज्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते?, असा सवाल मंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला केला आहे.

शासनाकडे पैसे नसताना आणि केंद्र सरकार जीएसटीचे पैसे देत नसताना सरकार 10 हजार कोटी रुपयांची मदत देत आहे. सदर मदत महिन्याभरात शासन शेतकऱ्यांना देईल. बिहार राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करते. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?, असा सवाल ही कदम यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

यापूर्वी ही,चंद्रकांत पाटलांनी उद्धवजींनी शरद पवार यांच्याकडेच सगळे अधिकार सोपवले असल्याची टीका केली होती. त्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादांना फारसे गांभीर्याने घ्यायची मला गरज वाटत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार आणि तीन ही पक्ष चांगले काम करीत आहेत. आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 98 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आमचे सगळ काही सुरळीत चालू असल्याचा दावा ही विश्वजित कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *