Breaking News

1/breakingnews/recent

माजी सैनिकांना ठाकरे सरकारचे गिफ्ट

No comments

  News24सह्याद्री -



मुंबई - 

आज २९ ऑक्टोबर, २०२० ला पार पडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाकरे सरकारने राज्यातील सर्व माजी सैनिकांना व सैनिक विधवा पत्नींना दिवाळी आधीच भेट दिली आहे. राज्यातील सर्व माजी सैनिकांना या पुढे घरपट्टी व मालमत्ता कर भरावा लागणार नाही. तसेच या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने माजी सैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.

याच दरम्यान या बैठकित काही अन्य निर्णय हि घेतलेले आहे, ते म्हणजे मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार असल्याचा अध्यादेश काढण्यास मान्यता दिली आहे. तसेच शिवभोजन थाळीचा दर दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० पासून पुढील सहा महिन्यांसाठी पाच रुपये करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *