Breaking News

1/breakingnews/recent

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते : राधाकृष्ण विखे पाटील

No comments

   News24सह्याद्री - 

मुंबई - 

“महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा” असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिला आहे. या व्यक्तव्यावरून भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते" असे म्हटले आहे. तसेच“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असे गर्वाने सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले आहे. तसेच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत.” असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

याच दरम्यान राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे” असे शरद पवार यांनी म्हटले होते. 

एवढच नाही तर केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत महटले आहे की, “केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे असा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? ” असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *