Breaking News

1/breakingnews/recent

सरकार का कुंथत आहे, कुठं घोडं अकडलेय? : राज ठाकरे

No comments

News24सह्याद्री -


मुंबई -

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. महाराष्ट्रात आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,' असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

तसेच, रेल्वे सुरू होत नाही. मंदिरांचा प्रश्न आहे. अकरावी प्रवेशाचा प्रश्न आहे. पण आज फक्त वाढीव बिलाबाबतच राज्यपालांशी चर्चा झाली आहे. तशी प्रश्नांची कमतरता नाही. फक्त निर्णयाची कमतरता आहे. आता सरकारने निर्णय घेतले पाहिजे. सरकार का निर्णय घेत नाही? कुठं घोडं अकडलंय? कशासाठी हे कुंथत आहेत? कुंथत कुंथत सरकार चालत नाही, जिथे दोन हजार बिल येत होते, तिथे दहा-दहा हजार बिल येत आहे. जिथे ५ हजार येत होते, तिथे २५ हजार येत आहे. मग हे राज्य सरकारला जर हे माहिती आहे, तर कशामध्ये हे प्रकरण अडकलेय ते माहिती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *