Breaking News

1/breakingnews/recent

शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है : अब्दुल सत्तार

No comments

  News24सह्याद्री -


मुंबई - 

राज ठाकरे यांनी राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपालांनी पवार साहेबांशी बोलण्यास सांगितले असे राज ठाकरे म्हणाले होते. पवारांना मी फोन करणार आहे' असे राज ठाकरे यांनी काल राज्यपालांशी भेटीनंतर माध्यमांना सांगितले होते. आता याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार म्हटले आहे की, शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा यांनी केला आहे.

तसेच राज ठाकरेंना य बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल असे म्हणत त्यांनी राज ठाकरे याना डिवचले आहे. शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असेही सत्तार यावेळी म्हणाले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *