Breaking News

1/breakingnews/recent

शरद पवारच राज्य चालवत आहे, उद्धव ठाकरे बाहेर पडतही नाहीत : चंद्रकांत पाटील

No comments

News24सह्याद्री- 




मुंबई - 

सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितले असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले कि, जर मला विचाराले तर सांगेन सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे यांना बोलुन काहीच फायदा नाही कारण ते बाहेर फिरतच नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटायला सांगितले असावे. सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचे अशी लोक भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले, तसेच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचे कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *