Breaking News

1/breakingnews/recent

जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या : नितीश कुमार

No comments

   News24सह्याद्री -



मुंबई - 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मात्र लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अमलबजावणी केली जाऊ शकते असेही ते म्हणाले आहेत. तसेच “जिथपर्यंत लोकसंख्येचा प्रश्न आहे तो निर्णय जनगणना झाल्यानतंरच घेऊ शकतो. तोपर्यंत निर्णय आपल्या हातात नाही. जातींच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण असवे यामध्ये आमच्यात कोणतेही दुमत नाही,” असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी यावेळी जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी स्पष्ट भाष्य केले नाही, तसेच नितीश कुमार यांनी याआधीही ही मागणी केली आहे.

याच दरम्यान नितीश कुमार यांनी यावेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या १० लाख रोजगाराच्या आश्वासनांचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. नितीश कुमार यावेळी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सहाय्याने आपण बिहारच्या विकासासाठी काम केल्याचा उल्लेख केला आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *