Breaking News

1/breakingnews/recent

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

No comments

 News24सह्याद्री -


मुंबई - 

  

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असुन आता राज्याचे कामगार मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा झाली असून,त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्विट करत म्हणाले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी. असे ते म्हटले आहे. 






No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *