मोठी बातमी - ‘सह्याद्रीचं कोंदण’ पुरस्कार जाहीर पहा कोण आहेत मानकरी
News24सह्याद्री -
संवदेनशिल समाजाच्या निर्मितीचा ध्यास घेऊन ‘नगर सह्याद्री’ दैनिकाचा प्रारंभ सात वर्षापूर्वी नगरमध्ये झाला. अवघ्या सात वर्षात जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या पाठबळावर ‘नगर सह्याद्री’ची वेगळी ओळख निर्माण झाली. अन्यायाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत, वंचित घटकांना न्याय देण्याचे काम ‘नगर सह्याद्री’ ने केले. न्यूज, व्ह्यूज आणि ऍनॅलिसिस या त्रिसुत्रीत काम करताना नगर शहरात आणि जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली. ही ओळख निर्माण होत असताना समाजासमोर ज्यांनी आपल्या उद्योग, व्यवसायातून आदर्श ठेवला अशा मान्यवरांचा गौरव व्हावा या उद्देशाने ‘सह्याद्रीचं कोंदण’ हा पुरस्कार सात मान्यवरांना जाहीर करण्यात आला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आ. संग्रामभैय्या जगताप, यांसह आमदार निलेश लंके जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, तसेच महापौर बाबासाहेब वाकळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा. होणार असल्याची माहिती दैनिक नगर सह्याद्री व न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी दिली.
‘कोहिनूर’ या वस्त्रदालनाच्या निमित्ताने नगरची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करणार्या प्रदीपशेठ गांधी यांना मरणोत्तर ‘सह्याद्रीचं कोंदण’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय नरेंद्र फिरोदिया, प्रशांत गडाख , संतोष बोथरा , सुभाष कायगावकर, रामशेठ मेंघाणी , नरेंद्र फिरोदिया,मच्छिंद्र लंके,सुनील मुनोत , के. के. शेट्टी , संतोष झावरे यांनाही ‘सह्याद्रीचं कोंदण’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.नगर सह्याद्री कार्यालय, कुंदननगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा येथे शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला असून वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संपादक शिवाजी शिर्के व सह्याद्री परिवाराने केले आहे.
No comments
Post a Comment