सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - नुकसान ग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज - मुख्यमंत्री
News24सह्याद्री -
अतिवृष्टीमुळे राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असतानाच राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केले आहे.. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर 'एसडीआरएफ'च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment