Breaking News

1/breakingnews/recent

ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणार्‍या महिलांना आता 'मेरी सहेली' करणार मदत

No comments

 News24सह्याद्री - 



नवी दिल्ली - 

ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने 'मेरी सहेली' मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) महिला शाखा महिला प्रवाश्यांची हालचाल जाणून घेतील आणि प्रवासादरम्यान त्यांना आत्म-संरक्षणाच्या युक्त्या शिकवतील. याशिवाय महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान काही अडचण आली तर मग लेडी विंग देखील त्याचे निदान करेल. या उपक्रमामुळे ट्रेनमधील महिलांवरील गुन्हे कमी होतील, असा रेल्वेचा विश्वास आहे.

RPF ची महिला विंग सीट नंबरची नोंद घेईल - या रेल्वे अभियानांतर्गत RPF ची महिला विंग एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांचा आसन क्रमांकाची नोंद घेईल आणि ही महिला प्रवाश्याला अज्ञात व्यक्तीकडून खाऊ-पिऊ नये याविषयी जागरूक करणार असून, त्यांना जे काही सामान घ्यावयाचे आहे त्यांनी ते आयआरसीटीसीचे विक्रेते किंवा त्यांच्या अधिकृत स्टॉलकडूनच घ्यावे. त्याचबरोबर RPF सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 आणि जीआरपी सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 1512 मध्येही जनजागृती केली जाईल.

प्रवासामध्ये काही अडचण असल्यास 182 वर डायल करा- एकट्याने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना कोणतीही समस्या किंवा अडचण भासल्यास RPF हेल्पलाईन क्रमांक 182 वर डायल करून ट्रेन एस्कॉर्टला आपल्याजवळ बोलावू शकतात. जे तेथे पोहोचल्या नंतर महिला प्रवाशाचे प्रश्न सोडवतील. दुसरीकडे, महिलांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर रेल्वे या मोहिमेतील महिला प्रवाश्यांचे फिडबॅक घेईल. जेणेकरून ही मोहीम अधिक चांगली करता येईल. माय सहेली या मोहिमेअंतर्गत RPF ने बनवलेल्या टीममध्ये केवळ महिला कर्मचारीच ठेवण्यात आल्या आहेत.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *