Breaking News

1/breakingnews/recent

IPL 2020 : कोलकाताविरुद्ध सामन्यात चेन्नईचा 6 विकेट्सने शानदार विजय

No comments

   News24सह्याद्री -


नवी दिल्ली -

कोलकाताविरुद्ध सामन्यात चेन्नईने 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 6 विकेट्स राखून पूर्ण केले आहे. रवींद्र जडेजाने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर खेचत विजय मिळवून दिला. तर चेन्नईने 4 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. रवींद्र जडेजाने निर्णायक क्षणी 11 चेंडूत 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने नाबाद 31 धावांची विजयी खेळी केली आहे.  तर ऋतुराज गायकवाडने 72 धावा केल्या. कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्थीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहे.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची चांगली सुरुवात झाली. शेन वॉटसन-ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर वॉटसन 14 धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अंबाती रायुडू आला. ऋतुराज आणि रायुडूने फटकेबाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. चेन्नईला 118 धावांवर दुसरा झटका लागला. रायुडू 38 रन्सवर आऊट झाला.

चेन्नईने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले असता कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. नितीशने एकूण 61 चेंडूच्या मदतीने 4 सिक्स आणि 10 फोरसह 87 धावा केल्या. तर शुभमन गिलने 26 रन्स केले. सुनील नारायणला आज विशेष करता आले नाही. सुनील 7 रन्सवर बाद झाला. रिंकू सिंहने 11 धावा केल्या. कर्णधार इयोन मॉर्गन 15 धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत 10 चेंडूत महत्वपूर्ण नाबाद 21 धावा केल्या. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सॅंटनर, रवींद्र जडेजा आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *