सारिपाट सह्याद्रीचा - के. के. रेंज : नोटीफिकेशन, रेडझोन आणि आरक्षण रद्द नाहीच

News24सह्याद्री -
नगर, पारनेेर आणि राहुरी या तीन तालुक्यांमधील २३ गावांमधील काही क्षेत्र लष्कर ताब्यात घेणार असा गेल्या काही वर्षांपासून आणि विशेषत: मागील सहा महिन्यांपासून होत चर्चेत आलेला मुद्दा लष्करानेच खोडून काढला आहे. असे कोणतेही भूसंपादन होणार नसल्याचे आज स्पष्ट झाल्याने राजकारण्यांनी या मुद्यावर पोळ्या भाजल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज लष्कराचे कर्नल जी.आर.कानन, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह पारनेर, नगर आणि राहुरी तहसीलदारांची आज झाली संयुक्त बैठक झाली. या बैठकीत लष्कराच्या वतीने अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली. संबंधित गावातील कुठल्याही खासगी जमीनीचे अधिग्रहण होणार नाही आणि शासकीय पातळीवर तसला कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
लष्कराच्या सरावाविषयी अधिनियम १९३८ (१९३८ च्या ५मधील कलम ९च्या पोटकलम २) नुसार लष्कराच्या सरावासाठी पुर्वकल्पना देउन यापुर्वीचा जो अध्यादेश दर पाच वर्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारीत होतो तोच अध्यादेश जारी केला जाईल आणि आताही तसेच झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये आणि अफवांना बळी पडु नये असे स्पष्टपणे लष्कराच्या वतीने या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे के. के. सरावक्षेत्रात आता जमीन अधिग्रहण होणार नाही ही बाब प्रशासकीय पातळीवर झाली आहे.
No comments
Post a Comment