सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - मोहटादेवी उत्सव 'या' पद्धतीने होणार साजरा

News24सह्याद्री - मोहटादेवी उत्सव 'या' पद्धतीने होणार साजरा....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर येणाऱ्या नवरात्र उत्सवा कडे सर्वांचेच लक्ष लागले असून सरकार या उत्सवाला परवानगी देणारा का नाही या बाबत अजूनही काही निर्णय झाला नाही मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जगदंबा देवी चे प्रमुख स्थान असलेले मोहटा देवी मंदिरात नवरात्री उत्सव साजरा होणार आहे मात्र कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावा मुले भाविकांना देवीचे थेट दर्शन घेता येणार नाही मोहटा देवी देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश अशोकराव भिलारे प्रांताधिकारी देवदत्त केकाण देवस्थानचे मुख्याधिकारी सुरेश भुंगे व विश्वस्त यांची नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीत नवरात्री उत्वाचे नियोजन करण्यात आले आहे.
17 ऑक्टोबर रोजी देवीचा मुखवटा प्रथेप्रमाणे साध्या पद्धतीने गावातून मोहटा गावात आणण्यात येणार यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद्य नसतील ठराविक लोक हा मुखवटा घेऊन गडावर जाणार असून,नवरात्र मध्ये देवीला घटी बसणाऱ्या महिलाना घटी बसण्यास परवानगी नसणार.श्री जगदंबा देवीची दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी काम पर्यंत पोहोचणार आहे. गाभाऱ्यात कोणालाही येण्यास प्रवेश नसणार, कावडी चे पाणी, कुस्त्याचा हंगाम, यावर्षी रद्द करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे हा उत्सव साजरा होणार असून भाविकांनी सुद्धा देवस्थान सहकार्य करावे आणि आरोग्यदायी कोणालाही काही तरस न होता उत्सव पार पडावा असं आवाहन देवस्थान समितीच्यावतीने आले आहे.
No comments
Post a Comment